Tuesday, February 18, 2014

अनपेक्षित

३६५ दिवस पूर्ण झाले ...
लग्न होऊन एक वर्ष झालं...

आणि मला नक्की काय वाटून घ्यावं कळत नाहीये... संपूर्ण आयुष्य एकत्र राहणार आहोतच, त्यातलं एक वर्ष झालं फक्त! एक वर्ष कमी झालं म्हणून वाईट वाटून घेण्याइतकी hopeless romantic मी नक्कीच नाही.. अमोलही नाही.. rather कोणीच नसेल.. अमोल खूप चांगला असल्याने त्याच्यासोबत एक वर्ष औट न होता राहणं ही काय लै भारी achievementपण नाही.. अर्थात त्याच्यासाठी नक्कीच ही कसोटी होती/आहे.

आज सकाळी उठून मी त्याला म्हणाले , "ओये, आपण आता जुने झालो का?"
तो आरश्यातून माझ्याकडे बघत राहिला.. म्हणजे तो माझ्या बाजूला उभा होता पण समोर आरसा होता.. त्यामुळे त्यानी मान वळवून माझ्याकडे बघण्याचे कष्ट न घेता समोर आरश्यात पाहिलं... (स्पष्टीकरण दिलेलं चांगलं असतं... मध्ये मला कोणीतरी विचारलं होतं "तुला तुझी प्रतिभा कुठे भेटते? " त्यांना उगाच वाटायचं आरश्यात वगैरे भेटते..)
 अमोल दात घासत असताना मी त्याला असे महत्वाचे प्रश्न विचारत असते.
"आज डबा नाही दिला तरी चालेल न?"
"कोल्सचं ३०% ऑफ कुपन आलंय.. आज जाउयात नं?"
"XYZ is bitch... तुलापण तसंच वाटतं ना?"
 मग तो आरश्यात बघत राहतो.. आणि मी "हा.. मीसुद्धा तोच विचार करत होते... आज नकोच असेल डबा/ आपल्याला गेल्यावेळी आवडलेला ग्रीन ड्रेस घ्यायचाय/ फक, she is bitchier than the bichiest girl i have ever known!" असं मला हव्या असलेल्या उत्तरावर त्याच्याकडून मान हलवून घेते...

पण आज मी "ओये आपण आता जुने झालो का?" नंतर काहीही न म्हणता त्याच्याकडे बघत बसले... काहीच अपेक्षित असं उत्तर नव्हतं... मला काय उत्तर ऐकायचं आहे हे मलाही माहित नव्हतं... त्यानेही अंमळ जास्त वेळ लावला दात घासायला, मला काय उत्तर ऐकायचं असेल ह्याचा विचार करत...

विषय निघालाच आहे म्हणून सांगते, मला अमेरिकेतलं पेप्सोडेंट जास्त strong वाटलं. टूथपेस्ट हा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी तसं काहीही गोड कधीही खाऊ शकते (गोड खाण्याबद्दल नखरे करणाऱ्या समस्त स्त्री-पुरुष वर्गाचा निषेध वगैरे) भारतात मी पेप्सोडेंट खाऊ शकायचे, इथली नाही खाता येत. इतकचं काय, जास्तवेळ ब्रशही नाही करता येत. तोंड झोंबायला लागतं. अमोलचं तोंड ओल्मोस्ट भाजलं असू शकतं इतका वेळ त्याने आज ब्रश केलं.

मी त्याच्या उत्तराची वाट बघत उभी होते. तो आता वर्षभराच्या अनुभवाने शहाणा झाला आहे. त्याने तोंड पुसत मला विचारलं "तुला काय वाटतं?" Safe आणि smart reply!
"अमोल, मी परत जरा वाढलीय का?" ..."तुला काय वाटतं?"
"अमोल , मला स्वयपाक जमायला लागला आहे नं?" .... "तुला काय वाटतं?"
"अमोल, ही पोस्ट फारच भंपक लिहिल्ये न?"... "तुला काय वाटतं?"

मला काय वाटतं... मला खरचं कळत नाहीये.
जेव्हा आपण  एखादी सुरुवात करत असतो तेव्हा छान छान अपेक्षा ठेवून असतो..काहीतरी ग्रेट  ठरवून असतो..थोडा बुरा तो लगताही है जेंव्हा  सगळंच मनासारखं होत नाही... पण अनेकदा अश्या अनपेक्षित गोष्टी घडत जातात ज्या इतक्या सुंदर असतात की अपेक्षिताच ओझंच  नाहीसं होतं.  साधारण एक वर्षाने ह्या गेम मध्ये प्रो होणं अपेक्षित असेल तर आम्ही अजून नक्कीच झाले नाहीयोत.. पण सगळ्या टिप्स अन ट्रिक्स आता जमायला लागल्यात... कठीण प्रश्न कधी विचारायचे हे मला कळलंय आणि कठीण उत्तरं कशी टाळायची हे त्याला... पण खरं सांगू तर , जेव्हा तुमच्याबरोबर तुमचा alter ego राहत असतो तेव्हा कठीण-सोप्पं, अपेक्षित-अनपेक्षित असं काहीच नसतं... जे असतं ते सगळं awesome असतं!

आम्ही कालच, निबंधाची सुरुवात-शेवट कविता किंवा सुविचारांनी करण्याबद्दल बोलत होतो.. आणि म्हणून ह्या पोस्टला "साजेसा" Dr. Seuss quote टाकून आपण शेवट करूयात... :-P

“We are all a little weird and life is a little weird, and when we find someone whose weirdness is compatible with ours, we join up with them and fall in mutual weirdness and call it love.”